Sunday, 13 June 2021

कोंकण किनारी बसलो आमचो गाव, गाजता त्याचा मिठबांव नाव




देवगड : दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग हि निसर्गसौंदर्याची वरदान लाभलेली पुण्यभूमी ! त्यातही प्रत्यक्ष देवांचा अधिवास असलेला देवगड. हि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याची निशाणी. 

याच पुण्यभूमीत असलेले , मिठबाव तांबळडेग, कातवणच्या रयतेचे श्रद्धास्थान आहे.


ब्रिटीशांच्या मीठबंदी कायद्याविरुद्ध १९३० साली येथे मिठाचा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहाच्या चळवळीचे सत्याग्रहींचे प्रमुख केंद्र हे श्री राशिवकालीन हिंदू-मराठा शैलीचे मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरमेश्वर मंदिर होते. छत्रपती शिवाजी महाराज कुणकेश्वर क्षेत्री आले तेव्हा त्यांचा पदस्पर्श या मिठबाव भूमीस झाला. खाडी पार करून इंदुल आचरेमार्गे ते कांदळगावला पोहचले. त्यानंतर राजे संभाजी महाराज, चिमाजी अप्पा, नानासाहेब पेशवे यांनीही या भागातील मंदिरात दर्शन घेऊन डागडुजी व नित्य धार्मिक कार्यासाठी सहाय्य केले. अमात्य निळकंठ बावडेकरांच्या अधिपत्याखाली व ८४ खेड्यांच्या श्री सिद्धेश्वर देवाच्या अखत्यारीत सारी देवस्थाने होती. मिठबाव श्री रामेश्वर मंदिराचा सुंदर कलाकुसर युक्त सभामंडप पेशवाईच्या पूर्वार्धात बांधला गेला. छत्रपती शाहू महाराजांचे मुतालिक चिमाजी अप्पा हे आपल्या प्रथम पत्नी रखुमाबाईंवर दैविक उपचारासाठी मिठबाव रामेश्वर मंदिरात आले. अरिष्ठ दूर करण्यासाठी त्यांनी श्री रामेश्वर देवाला पालखी नजर केली होती. अमात्य बावडेकर इंग्रजांच्या आमदानीत या विभागाचे सर्वाधिकारी होते. १७९५ साली मुराररावे राणे यांच्या नेतृत्वाखाली गाव शिष्टमंडळाने गाव रहाटीतील न्यायनिवाडा सवाई माधवराव पेशवे यांच्या आदेशाने करून घेतल्याचा दस्तऐवज आहे. १८९० च्या दरम्यान झालेल्या दंग्यात देवस्थान कारभारी कुळकर्णी ऐतिहासिक दफ्तर घेऊन परागंदा झाले. त्यामुळे हि मौखिक माहिती चालत आलेली आहे. 


रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार 
परकीय सत्तांच्या जुलुमी कारस्थानामुळे व नापमानाच्या गुंत्यात अडकल्याने गेली १०० वर्षे काही ठराविक उत्सव सोडले तर गावातील देवाचे वार्षिक बंद होते . आता नूतन मंदिर उभारणीनंतर पुन्हा केवळ आख्यायिका ठरलेले वार्षिक धुमधडाक्यात सुरु झाले पाहिजे.सारा लवाजमा घेऊन वाजत गाजत मिठबावचा रामेश्वर कुणकेश्वराच्या भेटीला जाईल व हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पाहता येईल, अशी ग्रामस्थांची इच्छा होती. ८ जून २०११ रोजी जीर्ण
मंदिराबाबत मिठबाव ग्रामदेवालये जीर्णोद्धार समिती मुंबई-मिठबाव व मिठबाव, तांबळडेग, कातवण ग्रामस्थ, मानकरी यांनी एकमुखी निर्णय घेऊन जीर्ण
झालेल्या श्री रामेश्वर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा निर्धार केला. मद्रासचे प्रसिद्ध आर्किटेक, डिझाईनर श्री. जी. श्रीनावसन यांच्याकडून तंजावरच्या श्री राजराजेश्वर मंदिरासारखे संकल्पचित्र तयार करून घेतले. सिंधुदुर्गातील तज्ञ इंजिनिअर आणि कॉन्ट्रॅक्टर श्री. अरुण भट यांच्याकडे मंदिर निर्माणाची
जबाबदारी सोपवली. पर्यटन क्षेत्राचे आकर्षण ठरावे अशी वास्तू निर्माण करण्याचा संकल्प १७ ऑक्टोबर २०११ रोजी झाला. ३१ ऑक्टोबर २०११ रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते शिलान्यास होऊन मंदिर उभारणीचा प्रारंभ झाला. मंदिराच्या प्रत्येक आविष्कारासाठी त्या-त्या विषयाचे तज्ञ कारागीर बेळगाव, कारवार, विजापूर, तंजावरहून आले. १४ फुट उंचीच्या गर्भाग्रहावर ३८ फुट उंचीचे शंकूच्या आकाराचे आमलकयुक्त भव्य शिखर, उत्तर-दक्षिण शिंपल्यावर १५ फुटांची उन्नत शिखरे ५४ स्तंभांच्या सभागृहावर अर्धगोलाकृती भव्य घुमट, छतावरील, स्तंभ-तुळ्यांवरील उत्कृष्ट संकल्पांचे पशुपक्षी, पाने- फुले, मानवी मुखवटे व केवलाकारी अलंकरण, श्री गणेश, नटराज, द्वारशक्ती व शिवपरीवाराच्या आकर्षक त्रिमित शिल्पकृती, नयनरम्य रंगरंगोटी या सौराभामुळे मंदिर चित्ताकर्षक झाले आहे. तीरुवायुचे श्री रामू, श्री शक्ती हे शिल्पज्ञ व त्यांचे सहाय्यक, कलावंत यांनी हि किमया घडविली आहे. मंदिरास साजेसे भव्य महाद्वार लक्षवेधक आहे. या नूतन वास्तूचे उद्घाटन देवमूर्ती प्रतिष्ठापना, वास्तूशांती व इतर धार्मिक कार्यक्रम तज्ञ वेदमूर्ती श्री दत्तात्रेय
शास्त्री मुरवणे व ब्रम्हवृदांकरवी ७ ते ११ मे २०१५ या दिवशी पार पडली
कालावधीत

No comments:

Post a Comment